• चर्चगेट येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन
    मुंबई , आशीष बुक सेंटर मार्फ़त चर्चगेट येथे इनकम टैक्स ऑफीसच्या पाठीमागे सुन्दरबाई सभागृहात भारताचे सर्वात मोठे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे . 20 ऑगस्ट पर्यन्त स. 10 ते 8 वा. पर्यन्त चालणाऱ्या ह्या पुस्तक प्रदर्शनात सर्व विषयावरील एकूण एक लाखापेक्षा जास्त शिर्षके उपलब्ध आहेत .या प्रदर्शनात कला ,आर्किटेक्चर, चिल्ड्रन , फिक्शन , कुकरी सहीत विविध विषयवार अनेक दुर्मिळ पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत . पुस्तकांवर मोठी सवलत दिली जाणार आहे .आयोजक दामजी निसार यांचे नुसार हे प्रदर्शन चांगली व स्वस्त पुस्तके लोकांना उपलब्ध व्हावीत या उद्देशाने आयोजित केले आहे .या पुस्तक प्रदर्शनाच्या पुस्तक प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलेले आहे .संपर्क :022-22061677 /9821520117 . 

    No comments