• गुन्हेगारीत युपी बिहारला मागे टाकत कल्याण अंबरनाथ तालुका पुढे


    कल्याण / गुन्हेगारीत युपी बिहारला मागे टाकत कल्याण व अंबरनाथ तालुका पुढे जात असल्याचे चित्र गेल्या काही तासात घडलेल्या घटनेहून दिसून येत आहे. एका घटनेत एका प्रेमी युगला तील तरुणांची गोळ्या झाडून हत्या करून तरुणी वर सामूहिक  बलात्कार करण्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका १६ वर्षाच्या दलित अल्पवयीन विद्यार्थीनि वर दारू पाजून दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटना बघता कल्याण व अंबरनाथ तालुके गुन्हेगारीत पुढच्या क्रमांकावर जात असल्याचे दिसून येत आहे.


    टिटवाळा पोलीस स्टेशन हद्दीतील आळंबी गावातील घडलेल्या घटनेत एक प्रेमी युगल बुलेट मोटारसायकलहून जात असताना दुसऱ्या दोन अनोळखी इसमानी त्यांना अडविले व तरुणीची ते छेड काढीत असल्याने गणेश दिनकर या तरुणी बरोबर असलेल्या तरुणाने याला विरोध दर्शविला असता त्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. व तरुणीला झाडीत नेऊन बलात्कार केला. या अनोळखी इसमानी गोळ्या झाडल्याने गणेश दिनकर या ३० वर्षांचा तरुण जागीच कोसळला. ही युपी बिहारला लाजवेल अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत फायरींग व बलात्कार करणाऱ्या दोन जणांनी तेथून पोबारा केला असून टिटवाळा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    तर दुसऱ्या घटनेत कल्याण ग्रामीण भागातील आडीवली ढोकली येथील एका शालेय दलित १६ वर्ष्याच्या विध्यर्थिनी वर दोन जणांनी दारू पाजून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शालेतून घरी चाललेल्या या विध्यर्थिनीला पकडून तिला जबरदस्ती दारू पाजून विशाल व गोपाळ नावाच्या दोन तरुणांनी बलात्कार केला. त्या नंतर हे दोघे पळून गेले व मुलीनी सुटका करीत घर गाठले.

    या दोन घटना बघता फडणविस सरकरच्या काळात मुली सुरक्षित घरा बाहेर पडू शकत नसल्याचे दिसून येत आहे. युपी बिहारला लाजवेल अश्या या घटना पाहता आता तरी सरकार मुलींच्या सुरक्षे विषयी खंबीर पाऊले उचलेल का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

    No comments